HeaderAd

पंढरपूर, अक्कलकोट, आणि तुळजापूर दर्शन यात्रा कमी वेळेत कमी बजेटमध्ये कशी करावी

पंढरपूर, अक्कलकोट, आणि तुळजापूर दर्शन यात्रा कमी वेळेत कमी बजेटमध्ये कशी करावी

प्रवास नियोजन आणि प्रवास अनुभव

प्रत्येकाला कधीना कधीतरी तीर्थ यात्रेसाठी जावे लागते. भले प्रत्येकाची तीर्थ क्षेत्रे वेगळी असू शकतात. या लेखात मी माझा पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर दर्शन यात्रेचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. मी माझी पत्नि आणि दोन मुले असे आम्ही चौघेजण प्रवासास निघालो. एक रात्र मुक्काम आणि दोन दिवस प्रवास असे आमच्या प्रवासाचे नियोजन निश्चित झाले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही सकाळी लवकर प्रवास सुरु करायचे ठरवले. पहाटेचे ५.३० मि. वेळ निश्चित करण्यात आली. नंतर माझा विचार बदलला आणि अजून एका रात्रीचा मुक्काम वाढवून रात्रीचा प्रवास करायचा ठरले. आमच्या प्रवासाचे नियोजन पुढीलप्रमाणे  साताऱ्यातून रात्री १० वाजताची एसटी पकडायची, पुढे पंढरपूर येथे मुक्काम करायचा आणि सकाळी लवकर पांडुरंगाचे दर्शन करून अक्कलकोट करायचे आणि तुळजापूर येथे दुसरा मुक्काम ठोकायचा.
पंढरपूर, अक्कलकोट, आणि तुळजापूर दर्शन यात्रा कमी वेळेत कमी बजेटमध्ये कशी करावी
सकाळीच मी सातारा एसटी स्टॅण्डवर जाऊन रात्रीच्या गाड्यांची चौकशी करून आलो होतो. रात्री ८, ९, आणि १० ला  अश्या तासाच्या अंतराने बसेस होत्या. आम्ही रात्रीचे जेवण नेहमीपेक्षा थोडेसे लवकरच केले कारण ९ किंवा १० दोन्हीपैकी जी बस मिळेल ती पकडायची होती. परंतु आम्हाला रात्री ८ वाजताची बस स्टॅण्डवर लागलेली दिसली. आम्ही सर्वजण बसकडे गेलो पाहतो तर काय बस फुल्ल होती कंडक्टर म्हणाले स्टँडिंग आहे, यायचं असेल तर चला. एवढ्या लांबचा प्रवास उभे राहून कसा करायचा म्हणून गाडी सोडून दिली. कारण पुढे रात्री ९ वाजताची गाडी येणार होतीच, ९ वाजताच्या गाडीला उशीर झाला होता, ती गाडी साडेनऊ वाजता आली, हैदराबाद गाडी होती दुर्दैव्य आमचे म्हणावे लागेल कारण त्यागाडीतील संपूर्ण जागा हैदराबाद पर्यंत बुकिंग झालेल्या होत्या. आता मात्र आमचं आम्हाला अवघड वाटू लागले. सकाळी आलो तेंव्हाच बुकिंग करायला हवे होते ते केले नाही म्हणून पश्चाताप वाटू लागला. थोडीसी चिडचिड होऊ लागली. कारण पुढची रात्री १० वाजताची शेवटची गाडी होती, गाडीला जास्त गर्दी असेल तर मात्र आपल्याला उभ्याने प्रवास करावा लागणारं याची भिती वाटत होती.

पंढरपूर, अक्कलकोट, आणि तुळजापूर दर्शन यात्रा कमी वेळेत कमी बजेटमध्ये कशी करावी

आम्ही उभे राहून थकलो म्हणून बाजूला जाऊन बसलो, परंतु प्रवाश्यांची धावपळ दिसली म्हणून कोणती गाडी लागली आहे पाहण्यासाठी गेलो, पाहतो तर काय सोलापूरला जाणारी शेवटची गाडी उभी होती आणि प्रवाश्यांची गाडीत चढण्यासाठी झुंबड उडाली होती. कसेबसे आम्ही गाडीत चढलो गाडी एकदम फुल्ल भरलेली. कशातरी आम्हाला तीन सीटवर जागा भेटल्या. आमच्यातील एकाला उभे राहाण्याची वेळ आली. पुन्हा आमच्यातल्या एकाला पकडलेली जागा सोडावी लागली कारण ती जागा अगोदरच बुक केलेली होती. दोघे बसून आणि दोघे उभे राहून प्रवासाला सुरुवात झाली. पुढे तासाभरात काही प्रवासी उतरले आणि राहिलेल्या दोघांना बसायला जागा मिळाली. गाडी रात्री १.४५ मिनिटांनी पंढरपुरात पोहोचली.
पंढरपूर, अक्कलकोट, आणि तुळजापूर दर्शन यात्रा कमी वेळेत कमी बजेटमध्ये कशी करावी
माझी तशी ही पहिलीच वेळ होती पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर दर्शन यात्रेची. तिथली मला कसलीही कल्पना नव्हती. प्रवासादरम्या शेजारच्या व्यक्तीशी गप्पा चांगल्याच रंगल्या, त्यांनी मला पुढे काय करायचे? कुठे जायचे? याचे चांगले मार्गदर्शन केले. आम्ही सर्वजण पंढरपूर स्टॅण्डवर उतरलो, माझ्या पत्निचीही एका कुटुंबाबरोबर प्रवासात ओळख झाली होती. त्यांनाही पंढरपूर करून पुढे तुळजापूरला जायचे होते. आम्ही सर्वजण कसे जायचे विचार करत होतो, तेवढ्यात आमच्यापाशी आज्जी आणि आजोबा आले आणि म्हणाले आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला चाललोय चला आमच्या पाठीमागे, ते दोघे नेहमी विठ्ठलाच्या दर्शनाला यायचे त्यामुळे त्यांना तिथली सर्व माहिती होती. आम्ही चौघे आणि गाडीत भेटलेले तिघांचे कुटुंब असे सर्वजण त्या दोघांच्या पाठीमागून चालू लागलो. पंढरपुरात पोहोचल्यावर पुन्हा आमचे मुक्कामाचे नियोजन बदलेले व पुढचे पण नियोजन बदलून गेले आणि दोन रात्री आणि दोन दिवसाच्या प्रवासांत आम्ही फक्त एकाच रात्रीचा मुक्काम करून आमची दर्शन यात्रा पूर्ण केली. पंढरपूर येथे रात्रीच दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो त्यामुळे मुक्कामाची गरज भासली नाही दुसऱ्या दिवशी अक्कलकोट येथे मुक्काम केला आणि शेवटी तुळजापूर करून म्हसवडचे दर्शन घेऊन सातारला परतलो.

टीप: आम्ही जी बस बुकिंग न करण्याची चूक केली, तशी तुम्ही करू नये. नाहीतर पुढची तारांबळ उडेल.

हे वाचा : सदगुरु श्री संत बाळूमामा समाधि मंदिर


पंढरपुरात पोहोचल्यावर काय करावे

प्रथम चंद्रभागेमध्ये हातपाय तोंड धुणे किंवा अंघोळ करणे, चंद्रभागेची ओटी भरणे, नदीतीरावर जेवढीपण मंदिरे आहेत त्या सर्व मंदिरांना भेटी देणे. नंतर विट्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहणे, आम्ही ज्या दिवशी पंढरपूरला गेलो होतो त्यादिवशी एकादशी होती त्यामुळे भक्तांनी दर्शन रांगेत झोपून नंबर लावलेले होते किंवा झोपले होते. नंबरला उभे राहण्यापूर्वी बाजूच्या कोणत्यातरी एका दुकानात आपले सामान व चप्पला जपून ठेवाव्यात, त्यांच्यापाशीच दर्शनाच्या रांगेची चौकशी करावी. पंढरपुरात दोन प्रकारच्या दर्शनाच्या रांगा असतात. एक मुख दर्शन आणि दुसरे पादस्पर्श दर्शन, पहिल्या प्रकारच्या दर्शन रांगेत विठ्ठलाचे लांबून दर्शन घेता येते, तर दुसऱ्या प्रकारच्या दर्शनाच्या रांगेतून विट्ठालाच्या पादुकांना स्पर्श करून दर्शन घेता येते.
पंढरपूर, अक्कलकोट, आणि तुळजापूर दर्शन यात्रा कमी वेळेत कमी बजेटमध्ये कशी करावी
मुख्य मंदिरात अनेक देव-देवतांची मंदिरे पाहायला मिळतात, तसेच पंढरपूर शहरात अनेक आणि मठ आहेत तुमच्या वेळेचे नियोजन करून तुम्ही त्या सर्व स्थानांना भेटी देऊ शकता.

हे वाचा : पंढरपूर दर्शन


अक्कलकोट मध्ये पोहोचल्यावर काय करावे

पंढरपूर, अक्कलकोट, आणि तुळजापूर दर्शन यात्रा कमी वेळेत कमी बजेटमध्ये कशी करावी
अक्कलकोट स्टॅण्डवरती उतरल्यावर प्रथम खंडोबाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे कारण जेंव्हा स्वामी प्रथम अक्कलकोटमध्ये आले होते तेंव्हा त्यांनी याच खंडोबाच्या मंदिरात काही काळ मुक्काम केला होता. खंडोबाचे दर्शन झाल्यावर नंतर समाधी मंदिर येथे जावे. समाधी मंदिरात चोळाप्पा महाराजांचा वाढा आहे. तिथे एक विहीर पण आहे ज्यामध्ये स्वामींनी अनेक नद्यांचे पाणी आणले आहे. त्या विहिरीचे पाणी अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ केली तर पाप मुक्ती होते, जर ते पाणी प्राशन केले तर अनेक आजार बरे होतात. तिथे तुम्हाला विहिरीच्या बाजूला लिहिलेली माहिती आढळून येते.
पंढरपूर, अक्कलकोट, आणि तुळजापूर दर्शन यात्रा कमी वेळेत कमी बजेटमध्ये कशी करावी
पुढे स्टॅण्डवर येऊन तुम्ही ऑटोरिक्षा करून गुरुमंदिर येथे भेट द्यावी. गुरुमंदिरात बाळाप्पा महाराजांचा मठ आहे, जिथे तुम्हाला स्वामींच्या पाऊल खुणा दिसतील. रिक्षाचे भाडे १० रुपये लागते. दर्शन झाल्यावर तुम्ही पाठीमागच्या बाजूला असलेल्या हॉलमध्ये प्रसादाची उत्तम सोय आहे. प्रसादासाठी लागणारी ताठ वाटी तुम्हाला स्वतःला जाऊन घेऊन यावी लागेल. प्रसाद घेऊन झाल्यावर ताठ वाटी स्वच्छ धुवून ठेवावी लागते. प्रसाद सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळी असतो.
पंढरपूर, अक्कलकोट, आणि तुळजापूर दर्शन यात्रा कमी वेळेत कमी बजेटमध्ये कशी करावी
पुढे तुम्ही पायी चालत वटवृक्ष मंदिराकडे जाऊ शकता. वटवृक्ष मंदिर हे मुख्य मंदिर आहे, ज्या वटवृक्षाखाली स्वामी ध्यानासाठी बसायचे तिथेच त्यांचे समाधी मंदिर बांधलेले आहे. दर्शन घेऊन झाल्यावर मंदिरामध्ये काही वेळ शांत बसून नामस्मरण करा मनाला खूप शांतता लाभेल. मंदिराच्या समोरच प्रसादकक्ष आहे तिथे तुम्ही प्रसाद घेऊ शकता. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस प्रसाद असतो. प्रसादासाठी खूप मोठी लाईन असते. परंतु गुरुमंदिरामध्ये प्रसादासाठी मोठी लाईन नसते. तुम्हाला जिथे सोयीचे वाटेल तिथे तुम्ही प्रसाद ग्रहण करू शकता.
पंढरपूर, अक्कलकोट, आणि तुळजापूर दर्शन यात्रा कमी वेळेत कमी बजेटमध्ये कशी करावी
मुक्कामासाठी भक्त निवास आहे, मंदिरापासून १ किलोमीटर अंतरावर ३ माजली २०० रूमचे भक्त निवास आहे. अगदी वाजवी दरात भक्त निवासात रूम्स आपल्याला उपलब्ध आहेत. तुम्हाला तिथे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. अक्कलकोट स्टँडवरून रिक्षा केल्यास २० रुपये भाडे आकारतात. भक्त निवासाचे वातावरण एकदम शांत आणि प्रसन्न वाटते. तुम्हाला चांगला अराम मिळतो.
पंढरपूर, अक्कलकोट, आणि तुळजापूर दर्शन यात्रा कमी वेळेत कमी बजेटमध्ये कशी करावी

हे वाचा : श्री स्वामी समर्थ - अक्कलकोट


तुळजापुरात पोहोचल्यावर काय करावे

तुळजापूरच्या स्टॅण्डवर उतरल्यावर मंदिराकडे पायी जाऊ शकता किंवा रिक्षाने जाऊ शकता. मंदिरात मोठ्या प्रमाणांत भाविकांची गर्दी असते. तुळजापुरात दोन प्रकारच्या दर्शन रांगा आहेत, फ्री पास आणि पेड पास,  सामान्य फ्री पास लाईन मध्ये उभे राहून दर्शन घेणार असला तर किमान ३ ते ५ तास दर्शनासाठी लागतात. जर तुम्हाला १ तासात दर्शन हवे असेल तर तुम्हाला २०० रुपये प्रति व्यक्ती दर्शन पास काढावा लागतो. तुमच्याकडे तुमच्या माहितीतील पुजारी असेल तर मग तुमचे काम आणखीनच सोपे होईल. आमच्याकडे कोणताही ओळखीचा पुजारी नव्हता. आम्ही दर्शनाला गेलो होतो तो दिवस होता मंगळवारचा त्या दिवशी देवीच्या दर्शनाला खूप गर्दी असते.
पंढरपूर, अक्कलकोट, आणि तुळजापूर दर्शन यात्रा कमी वेळेत कमी बजेटमध्ये कशी करावी
आम्ही दर्शनाची विचारपूस करत असताना आम्हाला अमोल छत्रे नावाचा पुजारी भेटला त्याने आम्हला खूप चांगली सेवा दिली. अगदी चप्पल ठेवण्यापासून ते दर्शन पास काढून देण्यापासून ते देवीची ओटी आणि माझ्या पत्नीची ओटी भारण्यापर्यंत सर्व काही मदत केली. आम्ही त्याला फक्त त्याचे पैसे दिले बाकी त्याने आम्हालाच सर्व काही करून दिले. त्यामुळे आमचे दर्शन खूप चांगल्या प्रकारे झाले. तिथे आम्ही इतर पुजारी भक्तांना कशी सेवा देत होते ते पाहात होतो. ते सर्व पुजारी स्वतःहून काहीच करत नव्हते, भक्तांनाच सर्व काही करायला लावायचे. अगदी रांगेत उभे राहून पास काढायला पण भक्तांनाच लावायचे आणि पुजारी महाराज फक्त मंदिरात पूजा करून द्यायचे एवढेच करत होते. परंतु आम्हाला मिळालेला पुजारी खरोखरच चांगला होता. देवीचीच कृपा म्हणावे लागेल.

दर्शन करायला आम्हाला जेवढा वेळ लागला नसेल त्याच्यापेक्षा जास्त वेळ दर्शन करून झाल्यावर मंदिरातून बाहेर येताना झाला. तुळजापुरला उष्णतेचा पारा जास्तच असतो, त्यामुळे खूप गरम होत होते. 

आमची पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर दर्शन यात्रा अगदी व्यवस्थित पार पडली, आम्ही कोणतेही धडसे प्रवासाचे नियोजन केलेले नसतानासुद्धा. परत येताना आम्ही म्हसवड येथे सिध्दनाथाचे दर्शन घेऊन संध्याकाळी घरी पोहोचलो. विशेष म्हणजे एवढ्या वर्षी आम्ही म्हसवडला गेलो असेन परंतु त्या दिवशी आम्हाला तिथे महाप्रसाद मिळाला हे आमचे मोठे भाग्यच होते.

हे वाचा : तिरुमाला तिरुपती देवस्थानम: भगवान व्यंकटेश्वराच्या निवासस्थानाचा अध्यात्मिक प्रवास


निष्कर्ष

शेवटी, आमची पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूरची यात्रा म्हणजे अनपेक्षित आव्हाने आणि अविस्मरणीय अनुभवांनी भरलेला प्रवास होता. आधी बसचे आरक्षण केले नसतानाही, काही अस्वस्थतेसह आम्ही आमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधण्यात यशस्वी झालो. आमची दर्शन यात्रा अर्थपूर्ण आणि यशस्वी करण्यात सहप्रवासी आणि स्थानिक लोकांचे मार्गदर्शन आणि सहाय्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावले.

प्रत्येक तीर्थस्थळी पोहोचल्यावर, आम्ही प्रत्येक ठिकाणाचे आध्यात्मिक सार अनुभवले आहे याची खात्री करून आम्ही इतरांनी सामायिक केलेल्या विधी आणि शिफारसींचे पालन केले. पंढरपूरच्या पवित्र नदीमध्ये हातपाय धुण्यापासून ते अक्कलकोट आणि तुळजापूरच्या मंदिरात आशीर्वाद घेण्यापर्यंत आम्ही दिव्य वातावरणात तल्लीन झालो. पुजार्‍यांशी संवाद, विशेषत: तुळजापूरमधील पुजार्‍याची अपवादात्मक सेवा, कायमची छाप सोडली. आमच्या प्रवासात सूक्ष्म नियोजनाचा अभाव असला तरी, आमच्या कुटुंबाच्या लवचिकता आणि अनुकूलतेचा तो पुरावा होता. तीर्थयात्रेने विश्वासाचे, समुदायाचे महत्त्व आणि आव्हानात्मक परिस्थितीतही मिळणाऱ्या आनंदाची आठवण करून दिली.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

१) आगाऊ बस आरक्षणाशिवाय प्रवास कसा करावा?

प्रवास करण्यापूर्वी आरक्षण करणे कधीही उत्तमच, परंतु आरक्षणाशिवाय बसने प्रवास करणे म्हणजे नशिबावर गोष्टी सोपविण्यासारखेच आहे. बसमध्ये उभे राहून प्रवास करणे, शेजारच्या प्रवाश्याला थोडेसे सरकून  बसण्याची विनंती विनंती करणे, आणि जवळच्या प्रवासातील प्रवाशी उतरण्याची वाट पाहणे.

२) पूर्व माहितीशिवाय तीर्थक्षेत्रे कशी करायची?

स्थानिक लोकांच्याकडून माहिती घेणे, त्या भागात जो जो व्यक्ती भेटेल त्याच्याकडून माहिती घेणे.

३) पंढरपुरातील दर्शन रांगा कोणत्या प्रकारच्या आहेत?

पंढरपुरात दोन प्रकारच्या दर्शन रांगा आहेत, मुख दर्शन म्हणजे विठ्ठलाचे लांबून दर्शन घेणे आणि पादस्पर्श म्हणजे विठ्ठलाचे जवळून दर्शन घेणे.

४) गर्दीच्या दिवशी तुळजापूरमध्ये सुरळीत दर्शनाचा लाभ कसा घ्यावा?

ओळखीच्या पुजाऱ्याच्या साहाय्याने सुलभ दर्शनाचा लाभ घ्यावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter spam link in the message box

Blogger द्वारे प्रायोजित.