HeaderAd

स्वतः विषयी | About Us


नमस्कार मित्रांनो,

मी मारुती कट्टे  Travellers Point चा संस्थापक. तुम्हा सर्व मराठी वाचकांचे माझ्या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करतो. Travellers Point चा मुख्य उद्देश मराठी वाचकांना पर्यटनाविषयी योग्य व थोडक्यात माहिती पुरविणे असा आहे. 

मी माझे शिक्षण पदवी पर्यंत पुर्ण  केलेले आहे. मी माझा  मूलभूत व्यवसाय आणि  ब्लॉगसाठी काम करीत आहे. मी जुलै २०२० पासून ब्लॉगिंग आणि अफिलिएट  मार्केटिंग करीत आहे. मी एका नामांकित खासगी कंपनीत काम करीत आहे. मागील १६ वर्षांपासून, प्रवास आणि विपणन-संबंधित क्षेत्रात काम केलेले आहे. माझ्या कारकिर्दीत  आत्तापर्यंत मी विमा, बँकिंग, वाहन, दुग्ध व्यवसाय , आणि पशुखाद्य यासारख्या विविध क्षेत्रात नोकरी केलेली आहे. 

नोकरीशी संबंधित असल्यामुळे मला वेगवेगळ्या शहरी आणि ग्रामीण भागातून प्रवास करावा लागतो. मी ग्रामीण जीवन जवळून अनुभवलेले आहे. दररोज नवे अनुभव येत आहेत. ते अनुभवपण  वाचकांपर्यंत पोहचवण्याचा माझा प्रयत्न असेल.

प्रवासी अनुभव, देशातील  आणि विदेशातील प्रसिध्द भेटीच्या ठिकाणांविषयी माहिती सामायिक करण्याचे मला आवडते. तसेच पर्यटनासोबत इतर संबंधीत बाबींविषयी माहिती सादर केलेली आहे. (उदा. राहण्याची व जेवणाची उत्तम सोयी , सणांविषयी थोडक्यात माहिती, जीवनशैली , बाजारपेठा आणि, आरोग्य इ.) म्हणुन  Travellers Point वाचकांसाठी एक माहिती प्रणाली असेल.

ब्लॉगिंग हे सामग्री लिहिणे आणि सामायिक करणे एवढेच नाही. Travellers Point पर्यटन स्थळांविषयी दर्जेदार माहिती प्रदान करते.

Travellers Point ऑनलाइन मासिके, वेबसाइट आणि लोक यासारख्या उपलब्ध स्त्रोतांकडून पर्यटन आणि गंतव्यस्थानांची माहिती संकलित करते. Travellers Point वरील माहिती तुम्हाला तुमच्या प्रवासाचे योग्य नियोजन करण्यासाठी मदतच करते. आपण आपल्या प्रवासाची, संशोधन स्थळांची योजना करा. आणि जगभरातील रीतीरिवाज, परंपरा, उत्सव आणि चवदार पदार्थांबद्दल जाणून घ्या.

सर्वात महत्वाचे म्हणजे Travellers Point वर आम्ही सर्व माहिती योग्य व सुटसुटीत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे . त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रवासाचे योग्य नियोजन करण्यास आम्ही सादर केलेली माहिती उपयोगी पडेल . 

Travellers Point

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter spam link in the message box

Blogger द्वारे प्रायोजित.