केदारनाथ मंदिर - एक न उमगलेल कोडं | Kedarnath Mandir - An Unseen Code in Marathi

केदारनाथ मंदिर । Kedarnath Mandir

केदारनाथ मंदिर (Kedarnath Mandir) हे एक प्राचीन भव्य शिव मंदिर असून रुद्र हिमालय पर्वतरांगेत वसलेले आहे. या मंदिराला एक हजार वर्षांहून अधिक काळ होऊन गेलेला आहे. एका विशाल आयताकृती दगडाच्या चबुतऱ्यावर बांधलेले आहे. मंदिराच्या पवित्र गर्भगृहाकडे जाणाऱ्या  मोठ्या राखाडी पायर्‍या चढताना, पायर्‍यावर पालीमध्ये कोरलेले शिलालेख सापडतात. सध्याचे मंदिर आदि शंकराचार्यांनी बांधले होते. मंदिरातीच्या आतील भिंती विविध देवतांच्या आणि पुराणकथांमधील दृश्यांनी सुशोभित केल्या आहेत. पौराणिक कथांनुसार, महाभारताच्या युद्धानंतर पांडवांनी त्यांच्या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी भगवान शिवाचा आशीर्वाद मागितला. भगवान शिव यांनी त्यांना वारंवार टाळले  आणि पळ काढताना बैलच्या रूपाने केदारनाथ येथे आश्रय घेतला. पाठोपाठ, त्याने पृष्ठभागावर त्याच्या कुबड मागे जमिनीत डुबकी मारली. मंदिराच्या दाराबाहेरील नंदी बैलची एक मोठी मूर्ती पहारेकरी म्हणून उभी आहे. यावेळी, मंदिराचे दरवाजे पवित्र तीर्थक्षेत्रासाठी संपूर्ण देशातून येणाऱ्या यात्रेकरुंसाठी खुले आहेत.

केदारनाथ मंदिर - एक न उमगलेल कोडं | Kedarnath Mandir

हिंदू धर्मात सर्वात पवित्र यात्रेपैकी एक केदारनाथ यात्रा(Kedarnath Yatra) आहे. गडवाल हिमालयातील मंदाकिनी नदीच्या शिखरावर असलेल्या डोंगरमाथ्यामध्ये हे स्थापित केले गेले आहे. केदार हे भगवान शिव, रक्षक आणि विध्वंसक यांचे आणखी एक नाव आहे. केदारनाथचे मंदिर(Kedarnath Mandir) अतिशय निसर्गरम्यपणे ठेवले आहे आणि त्याच्या सभोवताल उंच, बर्फाच्छादित पर्वत आहेत आणि उन्हाळ्यात हिरव्या कुरणात व्यापतात. मंदिराच्या पाठीमागे एक उंच केदारडोम शिखर आहे, ते शिखर आपण लांबून पण सहज पाहू शकतो. मंदिराचे दर्शन आणि सतत स्नूज असलेले शिखर फक्त मोहक बनवतात.केदारनाथ मंदिर - एक न उमगलेल कोडं-Kedarnath Mandir - An Unseen Code

केदारनाथ मंदीराचे बांधकाम कोणी केलं?(#Who built the Kedarnath Mandir?) याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्याबाबत आपल्याला अगदी पांडवकाळापासून ते सध्या  शंकराचार्य यांच्या पर्यंतचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आपल्याला त्यात इतक्या खोलात जायचं नाही.

सध्याच्या विज्ञानाच्या म्हणण्यानुसार केदारनाथ मंदिराची(Kedarnath Mandir) निर्मिती ही साधारणतः ८ व्या शतकात झाली असावी सध्याचा विज्ञानाचा अंदाज आहे. हे मंदिर १००० वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून येथे अस्तित्वात आहे. केदारनाथ येथील भूभागाची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल अशी आजही २१ व्या शतकातही पाहायला मिळते. केदारनाथ मंदिराला(Kedarnath Mandir) तीन ऊंच पर्वतांनी वेढलेले आहे. केदारनाथचा डोंगर(उंची २२०००फूट), करचकुंड पर्वत(उंची २१,६०० फूट) आणि, भरतकुंड(उंची २२,७०० फूट ). येथील पर्वतातून ५ नद्या वाहतात असे पुराणात लिहिलेले आढळून येते(मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी). येथे सध्या  फक्त "मंदाकिनी नदीचं" राज्य आहे असे दिसते.हिवाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात बर्फ तर पावसाळ्यात वेगाने वाहणारं नद्याचे पाणी. अशा प्रतिकूल जागेत एखादी रचना उभी करायची  म्हणजे किती अवघड आहे. केदारनाथ मंदिराकडे जाण्यासाठी आजही चांगले रस्ते नाहीत.

पृथ्वीवर १३०० ते १७०० या  काळात मोठी हिमवृष्टी झाली होती, हे मंदिर एक छोट्या "हिमवर्ष" कालखंडाला सामोरं गेलं असावा असा अंदाज वैज्ञानिकांचा आहे. त्यागोष्टीची पडताळणी करण्यासाठी "वाडिया इंस्टीट्युट ऑफ जीओलोजी डेहराडून" संस्थेने केदारनाथ मंदिराच्या(Kedarnath Mandir) दगडांवर "दगडांच आयुष्य" ओळखण्याच्या चाचण्या केल्या. यावरून हे स्पष्ट दिसून आले  की ,  १४ व्या ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे केदारनाथ मंदिर बर्फाखाली गाडलं गेलं होत. तरीसुद्धा कोणतेही नुकसान केदारनाथ मंदिराच्या(Kedarnath Mandir) बांधकामाला झालेले दिसत नाही.

आठ वर्षांपूर्वी केदारनाथमधील महाप्रलय आपण सगळ्यांनी पाहायला असलेच.ढगफुटीमुळे  "सरासरी पेक्षा ३७५% जास्त" पाऊस पडला होता. त्यामुळे आलेल्या महाप्रलयात तब्बल सहा हजार लोकांना जीव गमवावा लागला. अनेक गावाचं नुकसान झालं.भारतीय वायूसेनेने एअरलिफ्ट करून अनेक लोकांचे स्थलांतर केले होते. अशा महाप्रलयातसुद्धा केदारनाथ मंदिराचे जरासुद्धा नुकसान झाले नाही हे विशेष.  तब्बल १००० वर्षानंतर सुद्धा हे मंदिर अगदी मजबुत उभे आहे. आपण जरी या पाठीमागे श्रद्धा मानली तरी हे मंदिर ज्या पद्धतीने बांधलेले आहे. मंदिर बांधकामासाठी निवडलेली जागा, दगड आणि हे मंदिर बांधताना वापरलेली संरचना त्यामुळेच हे मंदिर महाप्रलयात अगदी दिमाखात उभं राहू शकलं असं आजचं विज्ञान सांगतं आहे.

जाणकाऱ्यांच्या मते केदारनाथ मंदिराचे (Kedarnath Mandir) बांधकाम "उत्तर–दक्षिण" दिशेला बांधलं गेलं असल्यामुळे ह्या मंदिराचे महाप्रलयात नुकसान झाले नाही. भारतातील इतर मंदिराप्रमाणे जर केदारनाथ मंदिराचे (Kedarnath Mandir) बांधकाम "पूर्व–पश्चिम" असे असते, तर ते आधीच नष्ट झालं असते किंवा महाप्रलयात तर नक्कीच नष्ट झालेच असतं. परंतु केदारनाथ मंदिर (Kedarnath Mandir) वाचलं आहे ते केवळ त्याच्या बांधकामाच्या दिशेमुळे. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे मंदिराच्या बांधकामासाठी जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ आहे. अन् विशेष म्हणजे जो दगड या मंदिराच्या निर्माणासाठी वापरला गेला आहे तो दगड या भागात उपलब्ध होत नाही. मग हे दगड मंदिर बांधण्यासाठी कसे आणले असतील याचा आपण विचार ना केलेलाच बरा ? कोणतेही यंत्र सामुग्री उपलब्ध नसताना मोठाले दगड वाहून नेणे सोपी गोष्ट नाही आपल्यासाठी. तब्बल चार दशके वर्ष हे मंदिर बर्फाखाली दडपलेले असताना सुद्धा मंदिराच्या बांधकामासाठी वापरलेल्या दगडांच्या गुणतत्वांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. केदारनाथ मंदिर (Kedarnath Mandir) निसर्गाच्या प्रचंड टोकाच्या कालचक्रातसुद्धा मंदिराची मजबुती टिकवून राहिलेली आपल्याला दिसून येते. मंदिराचे बांधकाम करताना हे मजबूत दगड "एशलर" पद्धतीने एकमेकांत गुंफलेले आहेत. यामुळे वातावरणातील तापमानाच्या प्रचंड बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जोडणीवर होत, म्हणून या मंदिराची मजबुती अजून तरी अभेद्यच आहे. देवाची लीलाच म्हणावी की काय म्हणून  महाप्रलयाच्या वेळी एक मोठी शिळा मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार  विभागली गेली परंतु मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने आपल्यासोबत सर्व काहीवाहून नेलं, मंदिर आणि मंदिरात शरण आलेले लोक सुरक्षित राहिले. ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायूदलाने एअरलिफ्ट केलं होतं.

श्रद्धेवर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा हे ज्याचे त्याच्यावर अवलंबून असते.  पण तब्बल १२०० वर्ष आपली संस्कृती, मजबुती टिकवून ठेवणारं मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याच बांधकामाचं मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही. "Titanic जहाज" बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना "NDT टेस्टिंग" आणि "तपमान" कसं सगळ्यांवर पाणी फिरवू शकते हे समजलं. परंतु आपल्याकडे तर त्या गोष्टीचा विचार १२०० वर्षापूर्वीच केला गेला होता.

केदारनाथ मंदिर (Kedarnath Mandir) त्याचे एक ज्वलंत उदाहरणं नाही का ? मंदिराच्या परिसरातील प्रचंड प्रतिकूल असलेली परिस्तिथी पाहता, कित्तेक महिने पावसात, कित्तेक वर्षे  बर्फाच्या आतमध्ये राहून सुद्धा ऊन, वारा, पाऊस यांचा सामना कीरत समुद्रसपाटी पासून ३९६९ फूट उंचीवर असलेले केदारनाथ मंदिराची (Kedarnath Mandir) रचना उंची ८५ फूट, लांबी १८७ फूट, रुंदी ८० फूट आणि तब्बल १२ फूट जाडीच्या भिंती आणि ६ फूट उंच दगडी चबुतरा देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल ह्याचा विचार जरी केला तरी आपण स्तब्ध होतोय.

आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने "१२ ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात उंचीवरच" असा मान मिळवणारं केदारनाथच्या वैज्ञानिकांच्या बांधणीपुढे आपण "नतमस्तक" होतो. 

आपली हिंदू धर्म-संस्कृती त्यावेळी किती प्रगत होती याचे हे एक उदाहरण घेता येईल. त्याकाळात ऋषीमुनी हे मोठे शास्त्रज्ञ असत असेच म्हणावे लागेल. वास्तुशास्त्र, हवामानशास्त्र, अंतराळ शास्त्र, आयुर्वेद शास्त्र यात आपले ऋषी अर्थात शास्त्रज्ञ यांनी खुप मोठी प्रगती केली होती. म्हणूनच मला मी "हिंदु"असल्याचा अभिमान वाटतो.


केदारनाथ मंदिराच्या जवळील परिसरात असलेली भेटीची ठिकाणे- #Places to visit near Kedarnath Mandir.  गौरीकुंड:#Gaurikund

हे ठिकाण केदारनाथ ट्रेकवरील एक बेस आहे. गावात गरम पाण्याचे झरे आहेत आणि हे मंदिर गौरी देवीला समर्पितआहे.

सोनप्रयाग:#Sonprayag

सोनप्रयाग हे केदारनाथ धामच्या यात्रेच्या मार्गावर असलेले धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. हे समुद्रसपाटीपासून १८२९ मीटर उंचीवर वसलेले आहे आणि बर्फाने झाकलेले पर्वत आणि हिरव्यागार सोनप्रयाग खोऱ्याचे एक विलक्षण दृश्य देते.

त्रियुगीनारायणः#Triyuginarayan

त्रियुगीनारायण हे रुद्रप्रयाग जिल्ह्यात स्थित एक सुप्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे नयनरम्य गाव १९८० मीटर उंचीवर आहे आणि सुंदर गढवाल प्रांताच्या बर्फाच्छादित पर्वतांचे विहंगम दृश्य प्रस्तुत करते. या मंदिराची वास्तुकला बद्रीनाथ मंदिराप्रमाणेच आहे.

वासुकि टाल :#Vasuki Tal

केदारनाथ धाममध्ये समुद्रसपाटीपासून १४२०० फूट उंचीवर वासुकि टाल एक हिमनदी तलाव आहे. केदारनाथ येथून ७ कि.मी. मध्यम ट्रेकपर्यंत पोहोचता येते. हिमालयाच्या शिखराभोवती समुद्र सपाटीपासून ४१५० मीटर उंचीवर हा तलाव आहे.

चोराबरी बामक ग्लेशियर:#Chorabari Bamak Glacier

चोराबरी बामक ग्लेशियर जिल्हा रुद्रप्रयाग येथे आहे. ग्लेशियर ६ किमी लांबीचा असून केदार-घुमट, भरतेखुंटा आणि कीर्ती स्तंभच्या दक्षिणेकडील उतारापासून उगम पावतो आणि हि डोंगररांग ग्लेशियर्स आणि चोराबरी हिमनदांचा गंगोत्री गट वेगळे करणारी पाण्याची विभागणी आहे. अनेक हँग ग्लेशियर आणि हिमस्खलन गटारे हिमनगाला भर घालतात. हिमनदीचा खालचा भाग जाड मलब्याने  व्यापलेला आहे आणि बाजूच्या मोरेनच्या मोठ्या ठेवींनी बांधलेला आहे. हिमनदी ६०० मी.पासून गोठण्यास सुरू होते आणि ३८०० मीटरच्या उंचीवर थांबते, तेथून एक हिमगोल प्रवाह उद्भवतो, ज्याला मंदाकिनी म्हणतात आणि रुद्रप्रयागच्या अलकनंदामध्ये विलीन होते. गौरीकुंड पर्यंत रुद्रप्रयाग, गुप्तकाशी आणि सोनप्रयाग मार्गे ग्लेशियर प्रवेश करण्यायोग्य आहे. गौरीकुंडपासून केदारनाथ मंदिरापर्यंत डोंगराच्या उतारावरून एक ट्रेक चालतो. केदारनाथ मंदिरापासून हिमनदीच्या स्नूथपर्यंत ३ कि.मी. पदपथ आहे. ग्लेशियरच्या दगडाच्या समोरील आणि उजव्या बाजूच्या मनोराच्या दरम्यान, ग्लेशियर वितळलेल्या पाण्याने तलाव तयार झालेला आहे त्याला गांधी-सरोवर असे म्हणतात.

केदारनाथला कसे जायचे ?- #How to go to the Kedarnath? 

विमानाने प्रवास:#By Air

२३८ किमी अंतरावर केदारनाथचे सर्वात जवळचे विमानतळ जॉली ग्रँट विमानतळ आहे. जॉली ग्रँट विमानतळ दररोजच्या विमानांसह दिल्लीशी चांगले जोडलेले आहे. गौरीकुंड हे जॉली ग्रँट विमानतळासह मोटरेबल रस्त्यांद्वारे चांगले जोडलेले आहे . जॉली ग्रँट विमानतळापासून गौरीकुंडला टॅक्सी उपलब्ध आहेत.

रेल्वेने प्रवास :#By Train

केदारनाथला सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन ऋषिकेश आहे. ऋषिकेश रेल्वे स्थानक राष्ट्रीय महामार्गावर केदारनाथच्या आधी २१६ कि.मी. अंतरावर आहे. ऋषिकेश हे रेल्वे स्थानक भारतातील प्रमुख रेल्वे स्थानकांनी चांगले जोडले गेलेले आहे आहे. ऋषिकेशला जाणाऱ्या रेल्वे  गाड्यांची वारंवाता जास्त आहे. गौरीकुंड हे ऋषिकेशला रस्त्याने वाहनांद्वारे चांगले जोडलेले आहे. टॅक्सी आणि बस ऋषिकेश ते गौरीकुंडला सहज उपलब्ध आहेत.

रस्त्याने प्रवास:#By Road 

गौरीकुंड म्हणजे केदारनाथला जाणारा रस्ता संपतो आणि १४ कि.मी.चा सोपा ट्रेक सुरू होतो. गौरीकुंड हे उत्तराखंड आणि भारताच्या उत्तर राज्यांतील मुख्य ठिकाणांसह वाहन रस्त्यानी चांगले जोडलेले आहेत. ऋषिकेश आणि श्रीनगरला जाणाऱ्या बसेस आयएसबीटी काश्मिरी गेट वरून उपलब्ध आहेत. देहरादून, ऋषिकेश, हरिद्वार, पौरी, टिहरी, उत्तरकाशी, श्रीनगर, चमोली इत्यादी उत्तराखंडमधील बड्या ठिकाणांमधून गौरीकुंडला जाणाऱ्या बसेस आणि टॅक्सी सहज उपलब्ध आहेत. रुद्रप्रयाग केदारनाथला जोडणारा गौरीकुंड राष्ट्रीय महामार्ग १०९ वर आहे.राज्य: उत्तराखंड

जिल्हा: रुद्रप्रयाग

कशासाठी प्रसिद्ध: तीर्थक्षेत्र

भाषा: हिंदी, गढवाल

सर्वोत्तम हंगाम: मे ते जून-सप्टेंबर ते ऑक्टोबर

हवामान: उन्हाळा ७  ते  १७ डिग्री से. ,

हिवाळा: -१४ ते  ८ डिग्री से

उंची: ३५५३ मी

|| ॐ नमः शिवाय ||

वरील सर्व माहिती संग्रहित माहितीच्या आधारे लिहिलेली आहे. 

अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. अशा सर्व प्रतिमा त्यांच्या संबंधित मालकांचे कॉपीराइट आहेत आणि आम्ही जिथे जमेल तिथे त्यांना श्रेय देण्याचा प्रयत्न करतो. तथापि, जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Please do not enter spam link in the message box

Travellers Point

Blogger द्वारा समर्थित.