आंबोलीमध्ये भेट देण्याची ठिकाणे आणि करण्याच्या गोष्टी | Places to visit and things to do in Amboli

आंबोली घाट आणि आंबोली परिसरातील नैसर्गिक दृश्ये । Landscapes of Amboli Ghat and Amboli area  

आंबोलीमध्ये भेट देण्याची ठिकाणे आणि करण्याच्या गोष्टी | Places to visit and things to do in Amboli

नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आंबोली घाटाला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी  पडणाऱ्या पावसाचे प्रमाण प्रचंड असते, खळखळून वाहणाऱ्या नद्या, नाले आणि मोठे धबधबे, घनदाट जंगले आणि मुबलक जैवविविधता असलेले नैसर्गिक प्रेक्षणीय ठिकाण (Sightseeing)  म्हणून सुद्धा आंबोलीकडे पर्यटकांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. आंबोलीच्या घाटात डोंगरांच्या उंचीवरुन वाहणारे असंख्य धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच झुंबड उडालेली पाहायला मिळते. आंबोलीतील वार्षिक पर्जन्यमान सरासरी ३५० सेंटीमीटर इतके असते. आंबोलीच्या पारपोली येथील धबधबा हा सर्वात मोठा धबधबा आहे. नांगरतास धबधबा आणि हिरण्यकेशी नदीचे  उगमस्थान सुद्धा आंबोलीतील पर्यटन स्थळ (Tourist place in Amboli) म्हणून पुढे आलेले आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगर रांगेत असलेल्या  आंबोली घाटात सर्वात जास्त धबधबे, घाटवळणाचे रस्ते यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हातील आंबोली घाट हा पर्यटकांचे व निसर्ग प्रमींचे आवडते पर्यटन ठिकाण (Favorite tourist destination) बनलेले आहे.

दिवसेंदिवस आंबोली घाटामध्ये पर्यटकांची गर्दी वाढत चाललेली आहे, त्यामुळे आंबोली घाटात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा शासना विचार करत आहे, त्यामुळे काही अनुचित प्रकारावर आळा बसू शकेल. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या किंवा धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली जाते. म्हणून सर्व पर्यटकांनी आंबोली पर्यटन संरक्षित क्षेत्र व नैसर्गिक साधन संपत्तीचे भान ठेवून पर्यटन केले पाहिजे. 

आंबोली घाटाविषयी माहिती (Information about Amboli Ghat)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्ग पर्यटनासाठीचे ठिकाण म्हणून आंबोली घाट आणि त्याचा परिसर अतिशय प्रसिद्ध आहे. आंबोली येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, गोवा आणि कर्नाटक येथील पर्यटक आंबोली गावातून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढऱ्या चमकदार धबधब्याखाली भिजण्यासाठी येथे येतात. आंबोलीचा धबधबा पर्यटकांना आकर्षित (Attracting tourists) करतो, म्हणूनच पर्यटक धबधब्याखाली तासंतास भिजतात आणि नृत्याचा आनंद घेतात. या धबधब्याखाली भिजण्यासाठी पर्यटक गर्दी करतात, याशिवाय पर्यटकांनी सोबत आणलेल्या म्युझिक सिस्टीमच्या गाण्यांवर पर्यटक धबधब्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर नाचतांना आपणास पाहायला मिळतात. कर्नाटक आणि गोवा येथून सर्वाधिक जास्त पर्यटक आंबोलीला येतात. ज्याप्रमाणे लोणावळा आणि खंडाळा ही दोन ठिकाणे पुणे आणि मुंबईतील पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत, अगदी त्याचप्रमाणे बेळगाव आणि गोवा येथील पर्यटकांमध्ये आंबोली हे लोकप्रिय भेटीचे ठिकाण (Amboli is a popular tourist destination) आहे. 

प्रत्येक श्वासामध्ये नवचैतन्याची निर्माण झाल्याची भावना (Feelings of rejuvenation in every breath) 

आंबोली येथे मुख्यतः पावसाळ्यातील रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. या पर्यटकांच्या अचानक येण्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. सुट्टीच्या दिवशी अंबोलीतील गर्दी इतकी मोठी आहे की त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. आंबोलीतील बर्‍याच ठिकाणी उंच पर्वतराजीवरुन खाली येणारे धबधबे आणि अधूनमधून येणाऱ्या रिमझिम पावसाने वातावरण मोहित होऊन जाते. आपल्याला आंबोलीमधील वातावरण अतिशय सुंदर आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेले पाहायला मिळते. इथले वातावरण खूप सुवासिक असून आपल्यात वेगळीच उर्जा निर्माण झाल्यासारखे वाटते. प्रत्येक श्वासामध्ये नवचैतन्याची निर्माण झाल्याची भावना होते. आणि काँक्रीटच्या जंगलात सतत काम केल्याने होणारा थकवा कधी अदृष्य होतो हे सुद्धा आपल्याला कळात नाही. रोजच्या दगदगीच्या जीवनातील कामांमुळे आलेला थकवा घालवण्यासाठी, मनाला ताजेतवान करण्यासाठी आणि नवीन ऊर्जा मिळावी यासाठी पर्यटक आंबोलीला जातात. आंबोली घाटातील हे सुंदर स्थान कायमचे लक्षात ठेवण्यासाठी बरेच पर्यटक फोटो काढण्यासाठी कॅमेर्‍या घेऊन येतात, म्हणून पर्यटकांनी रस्त्यावर फोटो काढणे सामान्य आहे. अंबोली घाट, हा परिसर आहे की ज्या ठिकाणाला निसर्गप्रेमींनी भेट देऊन या ठिकाणच्या सुंदर सौंदर्याचा अनुभव घेतलाच पाहिजे. एकदातरी आपल्या कुटुंबासोबत   आंबोलीला भेट दिली पाहिजे.

आंबोलीची ऐतिहासिक माहिती (Historical information of Amboli)

असे म्हणतात की एकेकाळी आंबोली ही सावंतवाडी संस्थानची उन्हाळी राजधानी होती. आंबोली समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर आहे. महात्मा गांधींनी शिरोडा येथे मीठ सत्याग्रह करण्यासाठी आंबोली घाटाचा मार्ग निवडला होता. हे आंबोलीचे महत्त्व अधोरेखित करते. आंबोलीला पोहोचल्यावर ऐतिहासिक किल्ल्याचे अवशेष दिसतात. इतिहासामध्ये असे म्हटले आहे की महादेव गड हा तटबंदीचा किल्ला आहे, लेफ्टनंट कर्नल मॉर्गन यांनी १८३० मध्ये जिंकला होता. इन्सान विल्मॉर्ट या ब्रिटीश सैनिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, आणि तेथे मरण पावलेला कर्नल लोथ्रा आणि त्याची पत्नी यांची समाधी आहे ती आपण रस्त्यावरून पाहू शकतो. सावंतवाडी हा कोकणातील एक महत्त्वाचा भाग आहे जो महादेव गडावरुन दिसतो. याखेरीज कुडाळ, फोंडा सारख्या अनेक मुलुखांवरही या किल्ल्यावरून नजर ठेवता येत होती.

आंबोली घाट कोठे आहे? (Where is Amboli Ghat located?)

आंबोली घाट हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या मधला दुवा आहे. आंबोलीला जाताना घाटवळण रस्त्याने प्रवास करावा लागतो. आंबोलीचा प्रवास खूप रोमांचक आहे. शिवाय, ही सहल निसर्गाचा जवळचा अनुभव घेण्याचा एक अद्भुत अनुभव आहे. येथे निसर्गाशी एकरूप होणे शक्य आहे. आंबोलीची पर्यटन सहल (Tourist trip to Amboli) ही मुले आणि तरूणांसाठी एक उपचार असू शकते. आंबोली घाटाच्या प्रवासादरम्यान घाटातील माकडे आपल्यासमोर अतिशय धाडसाने समोर येतात. इथली माकडे माणसांना घाबरत नाहीत ती माणसाळलेली आहेत, कारण येथे येणाऱ्या पर्यटकांकडून त्यांना खायला मिळते आणि सतत पर्यटकांच्या आजूबाजूला वावरताना दिसतील. इथली माकडे पर्यटकांच्या जवळ येतात आणि खाद्यपदार्थांसाठी पर्यटकांकडे आशेने पाहतात. माकडांनी पर्यटकांच्या हातातून वस्तू हिसकावून घेण्याच्या घटना येथे नेहमीच घडत असतात.

Amboli Waterfalls

आंबोली ते धबधब्याकडे जाताना मक्याची कणसे, चहा, वडा पाव यांच्या बऱ्याच टपऱ्या किंवा दुकाने आहेत. नेहमीच हजारो पर्यटक असल्याने येथे नेहमीच पोलिसांची उपस्थिती असते. येथे पावसाळ्यात दिवसभर दाट धुके पसरलेले असते. या धुक्यामुळे रस्त्यावर वाहन चालविणे अवघड होते. पण या वातावरणात पावसात नाचणे, पावसात भिजत चालणे हा अनुभव नेहमीच संस्मरणीय असतो. तुम्ही पर्यटनासाठी आंबोलीला जात असाल तर पावसात भिजणे अनिवार्य आहे. कारण आंबोलीला पर्यटन करताना पावसात भिजणे हे पर्यटनाचाच अविभाज्य भाग असतो. म्हणजे हे कसे झाले की, तुम्ही देवदर्शनाला जाता आणि देवाचे दर्शन न घेताच परत आला. जेव्हा तुम्ही धबधब्याकडे जाचाल तेव्हा तुम्हाला तुमचे मोबाईल फोन, कॅमेरे इत्यादींची काळजी घ्यावी लागेल. आंबोलीच्या धबधब्याखाली मनसोक्त भिजल्यावर गरम चहाचा आस्वाद घेण्याची मजा काही वेगळीच असते. गरम-गरम भाजलेल्या मक्याची कणसे लिंबू, मीठ आणि चटणी चोळून खाण्याचा आनंद वेगळाच मिळतो.

हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान (The source of the river Hiranyakeshi)

आंबोलीमध्ये भेट देण्याची ठिकाणे आणि करण्याच्या गोष्टी | Places to visit and things to do in Amboli - Hiranyakeshi River

आंबोली पासून सुमारे ४ कि.मी. अंतरावर पार्वती देवीचे मंदिर आहे. येथे पर्यटक देवी पार्वतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात आणि आसपासचा सुंदर परिसर पाहतात. हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानाबद्दल स्थानिक आख्यायिकेनुसार, महादेवाने माता पार्वतीसाठी जलगंगा किंवा हिरण्यकेशी नदी तयार केली. पार्वतीच्या मंदिरासमोर एक लहान तलाव आहे. गायमुखातून येणारे पाणी या तलावात जमा होते. जवळच एक गुहा आहे, स्थानिक लोकही या गुहेविषयी अनेक रंजक किस्से सांगतात. ही गुहा दोन ते तीन किलोमीटर लांबीची असून आत सात तलाव आहेत. हिरण्यकेशी नदीच्या उगमापासून 'नांगरतास' नावाचा धबधबा आहे. आंबोली ते नांगरतास हे अंतर सुमारे ८ कि.मी. आहे. आपण येथे पर्यटनासाठी देखील जाऊ शकता. आंबोलीच्या क्षेत्रामध्ये आपण स्थानिक माहितीगाराची  किंवा मार्गदर्शकाची मदत घेऊ शकता. यामुळे वेळेची बचत होऊन पर्यटन सोपे होते.

कावळेशेत पॉईंट

कावळेशेत पॉईंट

कावळेशेत पॉईंट हा अंबोलीतील प्रत्येकाच्या आकर्षनाचा केंद्र बिंदु आहे. जेव्हा तुम्ही कावळेशेत  पॉईंटवर जाता तेव्हा तुम्हाला एक अत्यंत खोल दरी दिसेल. म्हणून ज्यांना उंच ठिकाणाची भीती वाटते त्यांनी येथे जाणे टाळले पाहिजे. या ठिकाणाला कावळेशेत पॉईंट का म्हटले जाते याचे कारण अतिशय मनोरंजक आहे. यासंदर्भात विचारले असता स्थानिक लोक म्हणाले की या खोऱ्यातून उलट दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड असतो की, त्यामुळे कावळ्यांना या दरीवरून  उडता येत नाही. परंतु स्थानिकांनी दिलेले हे उत्तर खूपच मजेशीर होते. दरीकडे फेकलेली कोणतीही वस्तू खालीदरीत न पडता ती वस्तू उलट दिशेने येणार्‍या हवेच्या दबावामुळे वस्तू पुन्हा बाहेर फेकली जाते. म्हणून येथे पर्यटक दरीत पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, रुमाल, टोप्या अशा वस्तू टाकतात आणि त्या वस्तू परत येताना पकडण्याचा प्रयत्न करतात. पण असे करणे हे खूप धोकादायक आहे.

आंबोलीत तुम्ही करण्याच्या गोष्टी (Things to do in Amboli)

जर तुम्ही आंबोलीला जात असाल तर माकडांना खाऊ देऊ नका. कारण माकडे जंगली प्राणी आहेत, त्यांना जंगलात निसर्गाने आहार दिलेला आहे. पर्यटकांच्या या वागणुकीमुळे वन्य प्राण्यांची जीवनशैली बदलते. कारण जंगले ही निसर्गाचा श्वास आहेत आणि निसर्ग हा माणसांचा श्वास आहेत. जर जंगले टिकून राहिली तर वन्यजीव जगतील आणि जर वन्य प्राणी जगले तर जैविक जीवनचक्र अविरत चालू  राहील, म्हणून पर्यटकांनी केवळ निसर्गाचे सौंदर्य अनुभवले पाहिजे. प्रवासादरम्यान नैसर्गिक हानी   होणार नाही याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.

जर आपण एखाद्या पर्यटनस्थळाला भेट देणार असाल तर आपल्याला त्या ठिकाणचा इतिहास माहित असेल तर पर्यटनाचा आनंद वाढतो, म्हणून आंबोलीला भेट देण्यापूर्वी तुम्हाला आंबोलीबद्दलची माहिती नक्कीच माहित असावी. आंबोलीच्या घनदाट जंगलात भटकण्याचा आनंद वेगळा असतो आणि मित्रांसमवेत असल्यास आनंद द्विगुणित होतो. तुम्ही कुटुंबासमवेत सहलीसाठी आंबोलीला जाऊ शकता. उन्हाळ्यातही अनेक पर्यटक आंबोलीला भेट देतात.

आंबोलीचे हवामान

आंबोलीचे हवामान समशीतोष्ण असून पावसाळ्यात याठिकाणी भरपूर पाऊस पडतो. हिवाळ्यात, सकाळी धुके जास्त असते आणि दिवसभर हवामान थंड असते. उन्हाळ्यात  गरम होते. पावसाळ्यात भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

चौकुलीच्या जंगलाचे आश्चर्यकारक सौंदर्य

आंबोली घाटाजवळ चौकुलीचे जंगल आहे. या जंगलात आपण वन्यजीव पाहू शकता. जंगलात हरिण,  ससे, गायी आणि जंगली मांजरे सारखे वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत.

आंबोलीतील इतर पर्यटन स्थळे (Other tourist destinations in Amboli)

आंबोलीत बरीच पर्यटन स्थळे (Tourist destinations) पाहायला मिळतात ज्यात महादेव गाड, कवळे साद, आणि सनसेट पॉईंट इ.

आंबोली कसे पोहोचेल? (How to reach Amboli?)

आंबोलीला जाण्यासाठी पुणे, कोल्हापूर, बेळगाव, सावंतवाडी, मुंबई इ. येथून आंबोली घाट गाठता येते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्य परिवहन मंडळाच्या बसेस येथे उपलब्ध आहेत. अतिशय सुंदर आणि जैवविविधतेने परिपूर्ण असलेला आंबोली घाट पाहणे आणि जतन करणे आवश्यक आहे, म्हणून प्रत्येकाने निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी निश्चितच आंबोलीला भेट दिली पाहिजे.


आंबोलीत कुठे थांबायचं? (Where to stop in Amboli?)

आंबोलीमध्ये जेवणाची उत्तम सुविधा आहे. आंबोली येथे महाराष्ट्र पर्यटन मंडळाचा रिसॉर्ट नसून महाराष्ट्र खाजगी पर्यटन मंडळाने परवानगी दिलेल्या ब्रेड अ‍ॅण्ड ब्रेकफास्ट योजनेंतर्गत बरीच खाजगी राहण्याची सोय व होमस्टेजदेखील पुरविल्या जाऊ शकतात. विविध दृष्टिकोन मिळविण्यासाठी भरपूर मार्गदर्शक आणि खाजगी वाहने आहेत.

अंतरे:- 

सावंतवाडी ते आंबोली घाट ३० कि.मी. आहे.

बेळगाव ते आंबोली हे अंतर ६० कि.मी. आहे..

गोवा ते आंबोली अंतर ११७ कि.मी. आहे.

आंबोली धबधबा गावपासून ३ कि.मी. आहे.

हिरण्याकेशी नदीचे उगमस्थान : आंबोलीपासून ४ कि.मी. आहे. 

अंबोलीपासून ८ कि.मी. अंतरावर नांगरतास धबधबा आहे.

महादेव गड: आंबोली बाजारापासून ३ कि.मी. आहे.

अबोली ते मुंबई अंतर ४८६ कि.मी. आहे.

सातारा ते आंबोली अंतर २२० कि.मी. आहे.

पुणे ते आंबोली अंतर ३४३ कि.मी. आहे.

रत्नागिरी ते आंबोली २०६ कि.मी. आहे.

सावंतवाडी रेल्वे स्टेशन ते आंबोली २६ कि.मी. आहे.

बेळगाव ते आंबोली अंतर ६८ कि.मी. आहे.

अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. अशा सर्व प्रतिमा त्यांच्या संबंधित मालकांचे कॉपीराइट आहेत आणि आम्ही जिथे जमेल तिथे त्यांना श्रेय देण्याचा प्रयत्न करतो. तथापि, जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Please do not enter spam link in the message box

Travellers Point

Blogger द्वारा समर्थित.