कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन । Tourism In Kolhapur District
महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून कोल्हापूर हे दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीकाठी वसलेले कोल्हापूर हे मोठे सुंदर शहर आहे. श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे देशातील ५२ आणि महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे.
शहराच्या आजूबाजूला पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य शाहूवाडी इत्यादी धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांची ठिकाणे आणि आकर्षणे आहेत. हे शहर आपल्या नैसर्गिक वातावरण आणि कोल्हापुरी चप्पल यांसोबतच अजून काही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.
येथील खाद्यपदार्थांपासून ते पर्यटनार्यंतच्या सर्वच गोष्टी खास असल्याचे अनुभवायला मिळते. येथे येणाऱ्या पर्यटकांचे येथील नैसर्गिक सौन्दर्य आणि संस्कृतीची सुंदरता पाहून मनच भरत नाही. कोल्हापूरमध्ये अशा बऱ्याच आकर्षक गोष्टी आहेत.
पौराणिक कथेनुसार, येथे प्राचीन काळी केशी नावाच्या राक्षसाचा मुलगा कोल्हासुराचे राज्य होते. तो लोकांचा छळ करीत होता लोकांना कोल्हासुराच्या छळामुळे जीवन जगणे नकोसे झाले होते म्हणून देवांच्या विनंतीवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले.
महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला परंतु मारताना तो शरण गेला आणि त्याने तिच्याकडे, त्याच्या नगराचे कोल्हापूर व करवीर ही जी नावे आहेत ती तशीच पुढेही राहावीत, असा वर मागितला. त्यामुळे या शहरास कोल्हापूर किंवा करवीर या नावाने ओळखले जाऊ लागले.
कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे | Tourist Places In Kolhapur District
१. श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर - Sri Mahalakshmi Temple, Kolhapur
![]() |
श्री महालक्ष्मी मंदिर, ज्याला दक्षिण काशी असेही म्हटले जाते. महालक्ष्मी देवीला समर्पित असलेले हे मंदिर ५२ शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे जिथे भक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा मोक्ष प्राप्तीसाठी येतात. हे कोल्हापुरातील सर्वाधिक आकर्षण आणि पर्यटन स्थळ आहे.
हे मंदिर कन्नड चालुक्यच्या कारकिर्दीत सुमारे ७ व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते. मंदिराच्या वास्तुवरचे नक्षीकाम, बाहेरील संरचना आणि स्तंभांची कलाकृती म्हणजे अद्भुत कलेचा नमुनाच पाहायला मिळतो. देवीची मूर्ती ३ फूट उंच काळा पाषाण आणि मौल्यवान रत्नांपासून बनविलेली असून ४० किलो वजनाची आहे.
महालक्ष्मीला अंबाबाई देवी म्हणूनही ओळखले जाते आणि हिंदूंमध्ये ती पूजनीय देवी आहे. या मंदिराला भारतातील सर्वात महत्वाच्या तीर्थस्थळांचा दर्जा आहे. कोल्हापूरातील पर्यटनात सर्वात पहिल्या क्रमांकाचे पर्यटन स्थळ आहे. हे मंदिर रेल्वे स्टेशन आणि शहराच्या मध्यवर्ती बस आगारापासून ५ किमी अंतरावर आहे. मंदिराजवळ भवानी देवीच्या सन्मानार्थ एक मंदिर आहे.
२. टेंबलाबाई मंदिर, कोल्हापूर - Tembalabai Temple, Kolhapur
![]() |
टेंबलाई टेकडी हे कोल्हापुरातील भेटीसाठीचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या टेकडीवर "टेंबलाबाई" देवीचे मंदिर आणि आणखी एक लहान मंदिर आहे. प्रत्येक आषाढीमध्ये मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी ओतण्याचा धार्मिक सोहळा भव्य प्रमाणात साजरा केला जातो. या टेकडीवर यमाई देवीचे पण एक मंदिर आहे. देवस्थान समितीने शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे.
टेकडीच्या मध्यभागी "गणपती" ची एक विशाल मूर्ती आहे. अभ्यागतांसाठी एक लहान बाग विकसित केली गेली आहे. दरवर्षी "श्रावण" महिन्यात "त्र्यंबोली यात्रा" म्हणून ओळखला जाणारा एक दिवसीय उत्सव होतो. यात्रेदरम्यान कोल्हापूरसह इतर सर्व भागातील लोक या ठिकाणी भेट देतात. नवरात्र उत्सवाच्या वेळी "महालक्ष्मी" ची मिरवणूक अंबाबाई मंदिर ते टेंबलाबाई मंदिरात नेण्यात येते.
असे म्हटले जाते की देवी "टेंबलाबाई" आणि देवी "महालक्ष्मी" भगिनी आहेत. राक्षसांविरूद्धच्या युद्धाच्या वेळी, "टेंबलाबाई" ने देवीला "महालक्ष्मी" ची मदत केली परंतु विजयानंतर "महालक्ष्मी" देवीने तिला मान दिला नाही ज्यामुळे देवी "टेम्लाबाई" संतप्त झाल्या आणि त्यामुळे ती टेंबलाई टेकडीवर येऊन स्थायिक झाली. म्हणूनच, नवरात्रात ही मिरवणूक काढली जाते, असा समज आहे की या दिवशी देवी महालक्ष्मी देवी टेंबलाबाईची भेट घेतात आणि लोक तिची पूजा मोठ्या भक्तीने करतात.
३. भवानी मंडप, कोल्हापूर - Bhavani Mandap, Kolhapur
![]() |
भवानी मंडप ही एक ऐतिहासिक इमारत आहे जी दक्षिण भारतातील कोल्हापूरच्या तटबंदीच्या शहराच्या मध्यभागी आहे. हे पश्चिमेकडील प्रसिद्ध आणि विशाल महालक्ष्मी मंदिराजवळ आहे. भवानी मंडप छत्रपती महाराजाचे दरबार व राजवाडा असायचा आणि आता सार्वजनिक स्मारकात रूपांतरित झालेले आणि कोल्हापूर शहरातील वारसा असलेले महत्त्वाचे स्थळ आहे. या राजवाड्यात शाहू महाराजांचे शिल्पे, सामग्री, जनावरे, लाकडी सिंहासन इत्यादी वास्तू आहेत आणि हे शहरातील एक प्रेक्षणीय स्थळ आहे.
४. न्यू पॅलेस संग्रहालय, कोल्हापूर - New Palace Museum, Kolhapur
![]() |
कसबा-बावडा मार्गावर ही प्राचीन वास्तू आहे. १८७७ ते १८८४ दरम्यान या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले. घासून घासून गुळगुळीत केलेल्या काळ्या पाषाण दगडांतील इमारतीचे बांधकाम म्हणजे वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुनाच आहे.
न्यु पॅलेसच्या आवारात आपल्याला कुस्तीचे मैदान, कारंजे, आणि सुंदर उद्यान पाहायला मिळते. मध्यभागी उंच मनोरा असून इमारत अष्टकोनी आहे. १८७७ मध्ये मनोऱ्यावर घड्याळ बसविण्यात आले आहे. थोड्या थोड्या अंतराव दोन मनोरे आहेत. शिवरायांच्या जीवनाची चित्रे येथील प्रत्येक काचेवर रेखाटलेली दिसतात.
श्री छत्रपती शाहू संग्रहालय आणि छत्रपती शाहू महाराज यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाणारे न्यु पॅलेस संग्रहालय कोल्हापुरातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटकांचे आकर्षण आहे.
राजवाड्याच्या तळमजल्यावर असलेले, संग्रहालयात कोल्हापूरच्या शाही जीवनाचा आढावा घेता येतो, ज्यात दागदागिने, वेशभूषा, नाणी, शस्त्रे, चित्रे आणि बिबट्या, सिंह, हरिण इत्यादींनी भरलेल्या वस्तूंचा समावेश आहे. फोटो गॅलरीसह, भरतकाम केलेले कमानी असलेले दरबार हॉल, कोरीव स्तंभ आणि मोठेपणा दर्शविणारा उंच सिंहासन.
५. ज्योतिबा मंदिर, कोल्हापूर - Jyotiba Temple, Kolhapur
![]() |
ज्योतिबास ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा अनेक नावांनीही ओळखतात.
कोल्हापूर शहराच्या वायव्ये दिशेस जेमतेम १५ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाच्या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग या नावाने पण ओळखतात. पसरट भूभागावर एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या सोंडे सारख्या दिसणाऱ्या या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात.
हा डोंगर पन्हाळय़ापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीचाच एक भाग आहे. या डोंगर माथ्यावर सपाट भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे. ज्योतिबा हे दैवत महादेव व सूर्याचे रूप मानले जाते. ज्योतिबाच्या डोंगरावर तीन प्रमुख देऊळे आहेत. ती म्हणजे ज्योतिबाचा अवतार घेतलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची देवांची आहेत.
पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात राक्षसांनी मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळली होती. कोल्हापूरच्या देवी अंबाबाईलाही या राक्षसांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी देवी अंबाबाईने तपश्चर्या करून केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग या देवतांचे आवाहन करून दैत्याचा संहार करण्याची विनंती केली.
ज्योतिबाने या दैत्यांशी युद्ध केले आणि यात रत्नासुराचा वध केला जो दैत्यांचा प्रमुख होता, ज्योतिबाच्या डोंगरावर दैत्याचा वध केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. देवीच्या रक्षणासाठी आणि तिच्यावर ज्योतिबाची दृष्टी सतत राहावी म्हणून ज्योतिबाच्या मंदिराची दिशा दक्षिणाभिमुख आहे.
१७३० मध्ये राणोजी शिंदे यांनी या जागी सध्याचे देवालय बांधले. या देवळाची लांबी ५७ फूट, रुंदी ३७ फूट, आणि त्याची उंची ७७ फूट शिखरा पर्यंतची आहे. आतील भाग मोहक आणि सरळ आहे तर बाह्यभागामध्ये पायऱ्यांची एक लांब चढाण समाविष्ट आहे जी मुख्य मंदिरात जाण्यासाठी यात्रेकरूंना चढणे आवश्यक आहे. ही चढाई सुमारे १०० पायऱ्यांची आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी याच डोंगरावर उपलब्ध असलेल्या दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपस्तंभ आहेत.
ज्योतिबाची मूर्ती काळ्या पाषाणात घडविलेली चर्तुर्भुज असून मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ अशी शस्त्रे आहेत. ज्योतिबाच्या शेजारी त्याचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा अंगरक्षक काळभैरव बाहेरील बाजूस असून त्याठिकाणी मूळ ज्योत सतत तेवत असते. काळभैरवाचे व ज्योतीचे दर्शन घेतल्यानंतर ज्योतिबाचे दर्शन घेण्याची येथील चालत आलेली रीत आहे. ज्योतिबाची बायको, "यमाई देवीची" हिची मूर्ती दगडाची आहे याच्यावर शेंदूर थापलेला दिसतो. ज्योतिबाच्या डोंगरावर पुजारी व दुकानदारांची घरे आहेत.
ज्योतिबाच्या डोंगरावर दर वर्षी श्रावणशुद्ध 'षष्टीला' आणि चैत्र महिन्यातील 'चैत्र पौर्णिमेला' येथे मोठी यात्रा भरते. कर्नाटक, महाराष्ट्र व देशाच्या इतर राज्यांतूनही लाखो भाविक येथे गोळा होतात. ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरश: भरून जातो. येथे धान्य, कापड, तांब्या-पितळेची भांडी, पूजेचेसाहित्य व मिठाई इत्यादी साहित्याची दुकाने सजलेली असतात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देऊळाभोवती घातली जाते. ज्योतिबाची चांदीची मूर्ती मिरवणूकीसाठी वापरतात. ही ज्योतिबाची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत पुढे यमाईदेवीच्या मंदिराकडे घेऊन जातात. या मिरवणुकीत अनेक सासनकाठय़ा नाचवल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेत छोटया मोठ्या अनेक सासन काठ्या असतात.
जोतिबाच्या यात्रेतील मानाची सासनकाठी सातारा तालुक्यातील निनाम-पाडळी येथील आहे. खरे सांगायचे झाले तर ज्योतिबाचे सर्वात प्राचीन मंदिर निनाम या गावी आहे. परंतु मानाची सासनकाठी पाडळी या गावात आहे. त्याचे कारण निनाम गावाचे भौगोलिक वातारणपण असू शकते, म्हणजे गावातील जागेच्या अभावी निनामची सासनकाठी शेजारच्या पाडळी गावात असते. मानाच्या १८ व एकूण ९६ सासनकाठ्या ज्योतिबाच्या यात्रेत सहभागी होतात.पूर्वी ज्योतिबा देवस्थानास शिंदे सरकारांकडून अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानचा खर्च भागविण्यात येतो.
६. रंकाळा तलाव, कोल्हापूर - Rankala Lake, Kolhapur
![]() |
कोल्हापुरातील रंकाळा तलावाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे स्थान असून पर्यटकांचे महत्वाचे आकर्षण होय. चित्रपटांचे चित्रिकरण, लेखक आणि कलाकारांसाठी हे एक सतत प्रेरणा देणारे ठिकाण आहे. या तलावावर कोल्हापुरातील लोकांचे फार प्रेम आहे.
येथे असलेले शालिनी पॅलेस आणि शांताकिरण स्टुडिओमध्ये परवानगीने चित्रपटांचे चित्रिकरण पाहायला मिळू शकते. हा तलाव खूप मोठा आणि दूरवर पसरलेला आहे.
तलावाच्या मध्यभागी एक रंक भैरवाचे मंदिर आहे. या तलावाला रंकळा असे नाव या मंदिरावरून देण्यात आले आहे. तलावासाठी राजघाट आणि मराठघाट असे दोन घाट आहेत. राजघाटावर रंकाळा मनोरा आणि त्याच्या समोर शालिनी पॅलेस पाहायला मिळतो. कोल्हापूरात रंकाळा चौपाटी अतिशय प्रसिद्ध असून स्थानिक लोकांचे आणि पर्यटकांचे महत्वाचे आकर्षण आहे.
रंकाळा चौपाटीवर संध्याकाळच्या वेळी सुखद वातावरणामध्ये पर्यटक व नागरिकांची मोठी गर्दी होत असते. येथे पर्यटक नौकाविहार, घोडेस्वारी, मुले उद्यानात खेळू शकतात तसेच भूक लागल्यास येथील स्टॉलवर असलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात.
७. कोपेश्वर मंदिर, कोल्हापूर - Kopeshwar Temple, Kolhapur
![]() |
कोल्हापुरातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक म्हणजे कोपेश्वर मंदिर, जे भगवान शिव यांना समर्पित आहे. शिलाहार राजा गंडारादित्यने १२ व्या शतकात कृष्णा नदीच्या काठी शंकूच्या आकारासारखे एक मंदिर बांधले.
हे दगडी मंदिर स्थापत्य रचनेचा एक चमत्कार मानला जातो कारण त्यातील गुंतागुंतीची रचना आणि भव्य शिल्पकृती हि त्या काळातील एक परिपूर्ण कामगिरी होती. तथापि, औरंगजेबच्या दक्षिण मोहिमेदरम्यान, भिंतींच्या खालच्या भागांवरील अनेक शिल्पे आणि शिल्पांचे नुकसान झाले. तथापि, आपण अद्याप या प्रेक्षणीय स्थळाला भेट देऊन खूप तपशील असलेल्या आश्चर्यकारक कलेचे कौतुक केले पाहिजे.
८. विशाळगड, कोल्हापूर - Vishalgad, Kolhapur
![]() |
कोल्हापूर शाहूवाडी तालुक्यातील विशालगड हा किल्ला आहे आणि स्थानिक लोक त्याला ‘खेलना’ असेही म्हणतात. बाजी प्रभू देशपांडे आणि विजापूरचा सिद्दी मसूद यांच्यात झालेल्या लढाईसाठी लोकप्रिय आहे. विशाळ म्हणजे भव्य, या नावातच त्याची किती भव्यता असल्याचे दिसून येते. ११३० मीटर व्याप्ती आणि समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंचीवर हा किल्ला वसलेला आहे.
विशाळगड किल्ला शिलाहार राजवटीने १०५८ मध्ये बांधला होता आणि सुरुवातीला खिलगिल किल्ला म्हणून ओळखला जात असे. हा किल्ला आदिलशहा, छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, मुघल सरदार अशा अनेक राज्यकर्त्यांकडे आणि नंतर ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. हजरत सईद मलिक रेहान मीरा साहेब यांचा प्रसिद्ध दर्गा या किल्ल्यात आहे आणि हजारो पर्यटक या दर्ग्यास भेटी देत असतात.
या किल्ल्याची सध्याची अवस्था बिकट झालेली दिसते, इतिहास प्रेमी संघटन आणि पुरातत्व खात्याने वारसा जपण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. किल्ल्याच्या नुकत्याच झालेल्या जीर्णोद्धाराचे काम ज्यामध्ये तटबंदी व प्रवेशद्वार निश्चित करण्यात आले आहेत. इतिहास व वारसा शाश्वत मार्गाने जपला जावा यासाठी पर्यटकांनी व स्थानिकांनीही किल्ल्याची काळजी घेतली पाहिजे.
पवनखिंड येथेच सिद्धी जोहरच्या सैन्यापासून आपल्या राजाच्या बचावासाठी मोजक्याच मराठा सैनिकांनी हजारो सैनिकांना रोखून धरले होते. जेव्हा शिवाजी महाराजांनी पन्हाळगड किल्ल्यावरील सिद्दी जोहरच्या वेढ्यातून विशाळगड किल्ल्यावर पळ काढण्याचा निर्णय घेतला.
तेंव्हा सिद्दी जोहरकडे तीस हजार सैन्य होते तर मराठा सैन्यात फक्त ६०० सैनिक होते. शिवाजी महाराजांनी वेढा असताना सुटका करून घेतली, तेव्हा सिद्दीला कळले की शिवाजी महाराज विशाळगडला जात आहेत आणि मराठा सैन्याच्या मागे त्यांनी आपले सैन्य पाठवले. शिवाजीचा एक निष्ठावंत सैनिक बाजी प्रभू यांनी घोड खिंड येथे ३०० सैनिकांसह मागे राहण्याचे ठरविले आणि शिवाजी महाराज विशालगड किल्ल्यावर पोहोचत नाहीत तोपर्यंत सिद्धी जोहरच्या सैन्याला थोपवून ठेवले.
९. ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क, कोल्हापूर - Dream World Water Park, Kolhapur
![]() |
कोल्हापुरात साप्ताहिक सुट्टीसाठी काही मार्ग शोधत आहात? तर मग आपल्यासाठी ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क हे उत्तम एक दिवसिय सहलीचे ठिकाण आहे. मनोरंजन पार्कचे वर्णन करण्यासाठी अमर्यादित मनोरंजन असे योग्य ठरेल. येथे सर्व वयोगटातील कांसाठी काहीतरी आहे आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र सवारी आहेत.
जेव्हा आपण आपल्या जवळच्या आणि प्रियजनांबरोबर स्वत:चा आनंद घेऊ इच्छित असाल, तर कुटुंबासह सवारी किंवा वॉटर पार्कमध्ये एकमेकांवर पाण्याचा शिडकाव केल्याने आपल्याला आनंद मिळू शकेल. स्पीड राइड्स, बॉडी राईड्स, ड्रॅगन राइड्स, ट्यूब राईड्स आणि हॉर्स राइडिंग ही उद्यानातील काही आकर्षणे आहेत.
मशीनच्या सहाय्याने कृत्रिम लाटा निर्माण करणारा एक वेव्ह पूलही आहे. आणखी एक आकर्षण म्हणजे स्काई मॅजिक व्हर्टेक्स पार्क. जे लोक विशिष्ट आजारांनी ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी काही निर्बंध आहेत. पूलमध्ये क्रियालपांचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित रक्षक तलावाच्या बाहेरून सतत नजर ठेवतात.
जर आपण पूलमध्ये पोहणे किंवा पाण्यातील क्रियालाप करण्याचा आनंद घेत असाल तर योग्य पोहण्याचे कपडे आवश्यक आहेत. आपले स्वतःचे टॉवेल ठेवणे चांगले आहे, अन्यथा पार्कमधील गिफ्ट शॉप मधून खरेदी करू शकता.
प्रवेश शुल्क: ५०० रुपये मुलांसाठी आणि ५५० रुपये प्रौढांसाठी.
१०. शालिनी पॅलेस, कोल्हापूर - Shalini Palace, Kolhapur
![]() |
कोल्हापुरातील रमणीय रंकाळा तलावाच्या काठावरील शालिनी पॅलेस म्हणजे कोल्हापुरातील भव्य खुण. छत्रपती शहाजी द्वितीय पूर महाराज आणि राणी प्रमिला राजे यांची कन्या राजकन्या श्रीमंत शालिनी राजे यांच्यानंतर या वारसा रचनेला नाव देण्यात आले आहे.
हि भव्य इमारत बागांसह १२ एकरांत पसरलेलीआहे आणि १९३१ ते १९३४ दरम्यान ८००००० रुपये खर्च करून या इमारतीचे बांधकाम केलेले आहे . काळा दगड आणि इटालियन संगमरवरी इमारतीला काचेच्या कमानी, लाकडी दारे आणि खिडक्या, एक प्रचंड घड्याळ असलेला मनोरा, बेल्जियमची काच इत्यादींनी सुशोभित केलेले हे १९८७ मध्ये त्रितारांकित हॉटेलमध्ये रुपांतरित झालेले महाराष्ट्राचे पहिले आणि एकमेव हेरिटेज आलिशान हॉटेल बनले.
११. दाजीपूर वन्यजीव अभयारण्य, कोल्हापूर - Dajipur Wildlife Sanctuary, Kolhapur
![]() |
जंगलांच्या घनदाट हिरवळीत संपूर्ण जीवनकाळातील उत्तम रोमांच आणि आठवणींचा अनुभव घेण्यासाठी दाजीपूर वन्यजीव अभयारण्य सफारीची निवड करा. दाजीपूर वन्यजीव अभयारण्य मध्ये चांगल्या खोल्यांत राहण्याची सोय आणि सफारीचा अनुभव घ्या आणि साहसी क्रियाकलापांमध्ये सामील व्हा.
आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासमवेत या ठिकाणी भेट द्या आणि दाजीपूर वन्यजीव अभयारण्य सफारी बुकिंगसाठी पॅडल बोटिंग आणि प्रेक्षणीय स्थळांसारख्या अनेक रोमांचक कार्यात भाग घ्या. मंत्रमुग्ध करणार्या शिबीर सत्रात जा, रोमांचक जंगल सफारीचा एक भाग व्हा आणि निश्चितच वन्यजीव पाहण्याचा आनंद घ्या.
१२. पन्हाळा गड, कोल्हापूर - Panhala Fort, Kolhapur
![]() |
पन्हाळा गड कोल्हापूर राजधानीच्या वायव्येस १२ कि.मी. अंतरावर आहे. हा किल्ला देशातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे आणि दक्षिण प्रांतातील सर्वात मोठा किल्ला आहे. विजापूर ते अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत महाराष्ट्रातून जाण्याऱ्या मुख्य व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी बांधला गेला. हे ठिकाण ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देण्याचे आवडते अशा लोकांसाठीचेच नाही परंतु ज्यांना फिरायला आवडते त्यांच्यासाठी देखील हे भेटीचे ठिकाण आहे.
सह्याद्रीच्या हिरव्यागार उतारांकडे नजर टाकल्यास, त्यास सुमारे ७ कि.मी. आडवे ओहोळे दिसतात आणि पूर्ण सुरक्षितेसाठी मोठ्या आकाराचे तीन दुहेरी-भिंत दरवाजे तुम्ही पाहू शकता. संपूर्ण पन्हाळा गडाची इमारत प्लेट्स, थर आणि पाया घालून बांधलेली आहे आणि या किल्ल्यावर मराठा, बहामास, मोगल इत्यादी अनेक राजवंशांच्या शैलींनी सज्ज आहे.
१२ व्या शतकाच्या उत्तरार्धात राजा भोजने पन्हाळा किल्ल्याची स्थापना केली. हे ११७८-१२०९ एडी दरम्यान मराठाच्या नंतरच्या धर्मांतरणासाठी बांधले गेले. इंडो-इस्लामिक शैलीचा वाडा महान मराठा शासक आणि कोल्हापूरची राणी- ताराबाई यांचे निवासस्थान म्हणून ओळखला जातो.
१३. इरविन कृषी संग्रहालय, कोल्हापूर - Irwin Agricultural Museum, Kolhapur
![]() |
इरविन कृषी संग्रहालय कृषीशी संबंधित उपकरणे प्रदर्शित करते. हे शहराच्या मध्यभागी आहे आणि सध्या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि स्वराज भवन म्हणूनही ओळखले जाते. आपल्याला आंध्रा मधील प्राचीन नाण्यांचा संग्रह, कुंभारकाम केलेली मातीची भांडी आणि १९४५ मध्ये ब्रम्हापुरी टेकड्यांमधून खोदलेल्या अनेक कांस्य कलाकृतीच्या सापडतील.
संग्रहालयाच्या इतर आकर्षणांपैकी एक म्हणजे पोसेडॉनची मूर्ती आहे. हे संग्रहाल लहान आहे परंतु या संग्रालयातील अद्वितीय संग्रह पाहण्यासारखा आहे. तर, कोल्हापुरात असताना देशातील काही विशेष कृषी संग्रहालयांपैकी एखाद्यास भेट देण्याची संधी गमावू नका.
१४. रामतीर्थ धबधबा, कोल्हापूर - Ramtirtha Falls, Kolhapur
![]() |
कोल्हापुरातील अजारा तालुका हिरण्यकेशी नदीच्या काठावर असलेला, रामतीर्थ धबधबा एक अद्वितीय शांतता आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध धबधबा आहे. एकदिवसीय सहलीसाठी आणि शहरातील घाई गडबडीपासून स्वत: ची सुटका करण्यासाठी हे स्थान मुख्यतः वापरले जाते. या भागात अनेक मंदिरे आहेत आणि पर्यटक येथे गर्दी करतात.
१५. बॉटनिकल गार्डन, कोल्हापूर - Botanical Gardens, Kolhapur
![]() |
कोल्हापुरातील पन्हाळा किल्ला संकुलामध्ये बॉटनिकल गार्डन म्हणजे तबक उद्यान म्हणून ओळखले जाते. उद्यान विविध प्रकारची वनस्पती आणि जीवजंतूंसाठी लोकप्रिय आहे आणि चालण्यासाठी किंवा सायकल चालविण्याकरिता चिन्हांकित खुणा असलेल्या वनराई विभागात सेट केल्या आहेत. आपण त्या ठिकाणी भेट देणार्या दुर्मिळ पक्ष्यांना शोधण्यासाठी किंवा मोहक निसर्गाच्या कुशीत एकांतात वेळ घालवण्यासाठी काही वेळा भेट देऊ शकता.
१६. तीन दरवाजा, कोल्हापूर - Teen Darwaja, Kolhapur
![]() |
तीन दरवाजा हे कोल्हापुरातील पन्हाळा गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. दोन प्रवेशद्वारांच्या मध्यभागी हा कमानदार अंगण असलेला हा दुहेरी प्रवेशद्वार आहे. बाहेरील गेटवर बाहेर पडायला कमाल मर्यादा आणि वर एक विस्तृत कक्ष आहे. अंतर्गत गेटमध्ये गणेशाच्या सुशोभित कोरीव कामांचा समावेश आहे. भिंतींवर जटिल शिलालेख कोरलेले आहेत.
१७. राधानगरी धरण, कोल्हापूर - Radhanagari Dam, Kolhapur
![]() |
राधानगरी धरण हे कोल्हापूर जवळ राधानगरीतील भोगावती नदीवर बांधले गेलेले भारतातील सर्वात जुने धरण आहे. सिंचन आणि जलविद्युत व्यतिरिक्त धरणाच्या पाण्याचा उपयोग शेजारच्या अनेक खेड्यांमध्ये वापर केला जातो. या व्यतिरिक्त धरणाचे सुंदर देखावे शहरातील लोकप्रिय पर्यटन स्थळ बनवतात.
१८. बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापूर - Binkhambi Ganesh Temple, Kolhapur
![]() |
कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराजवळील सावरकर मार्गावर स्थित, बिनखांबी गणेश मंदिर श्रीगणेशाला समर्पित आहे. एकही खांब त्याच्या छताला आधार देत नाही, या दृष्टीने हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाजारपेठेच्या मध्यभागी हे बांधलेले त्याच्या बाजूला बरीच दुकाने पाहायला मिळतात.
१९. गगनबावडा, कोल्हापूर - Gaganbawda, Kolhapur
![]() |
कोल्हापूरपासून ५५ कि.मी. अंतरावर, गगनबावडा हे पश्चिम घाट किंवा सह्याद्रीच्या वर एक शहर आहे. डोंगराळ शहर अविकसित आहे आणि बहुतेक या भागात गगनगड किल्ला, करुळ घाट आणि भुईववडा घाट यासाठी प्रसिद्ध आहे. या गावात लक्ष्मीपूर धरण आणि पांडव लेणी देखील आहेत. आणि बॉलिवूडच्या बर्याच चित्रपटांमध्ये त्याचे चित्रीकरण झाले आहे.
२०. सिद्धगिरी संग्रहालय, कोल्हापूर - Siddhagiri Museum, Kolhapur
![]() |
याला कणेरी मठ म्हणून पण ओळखले जाते. कोल्हापूरच्या कणेरी येथे सिद्धगिरी ग्रामजीवन मेण संग्रहालय आहे. श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ आणि शिव मंदिरात हे संग्रहालय आहे. मेण व सिमेंट शिल्पांच्या मदतीने ग्रामीण जीवनाचे संग्रहालयात चित्रण आहे. ७ एकरात पसरलेल्या, या भांडाराचा सभोवताल हिरव्यागार आणि ग्रामीण भागात आहे.
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. अशा सर्व प्रतिमा त्यांच्या संबंधित मालकांचे कॉपीराइट आहेत आणि आम्ही जिथे जमेल तिथे त्यांना श्रेय देण्याचा प्रयत्न करतो. तथापि, जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Please do not enter spam link in the message box